डोंबिवली वासी, वास नाकाशी, कचरा दाटे चोहीकडे
क्षणात येती समोर वासरे, क्षणात मागे डुक्क्रर फिरे
स्टेशन बघता अलोट गर्दी, जीव जाई शिणलासे
काँक्रीट्च्या ह्या बिल्डींगींचा गोफ कुणई हा विणलासे?
झालेले जंगल हे वाटे, गच्च आहाहा ठाण्यात
तापती जन, मृत्यू दारी, कावळे पडता पाण्यात
फडफड करूनी भिजले आपुले कपडे जन हे आवरती
गर्दी हेची प्राक्तन धरूनि मनास अपुल्या सावरती
वासाचेच अत्तर करूनि प्रफुल्लित मग जन होती
सगळ्या चिंता फाटी मारूनी मराठी मने ती सजती
पाट वाहती कलागुणांचे गुणीजनांच्या नगरात
मराठीयांच्या संस्कृतीचे, वर्धन होते थाटात
प्राप्य जीवना कवटाळावे कसे ते पहावे नीट
कल्लोळातही श्रावण फुलतो मग अपुल्या डोंबिवलीत

No comments:
Post a Comment