ह्या ब्लॉग चा टी.आर.पी. वाढविण्यासाठी नवीन वर्षात अनेक क्लृप्त्या आणि शक्कला लढविण्याचे आम्ही ठरविले आहे. त्या दृष्टीने हे एक नवीन सदर सुरू करत आहोत.
गांधीगिरीचा साराव केल्याबद्दल ट्रॅफिक पोलिसांचे आम्ही अभिनंदन करतो. वाहतुकीचे नियम मोडणार्यांना गुलाबाची फुले देणारी ही व्यक्ती आपण असल्यास आम्हाला संपर्क करा. (तुम्ही पोलिस असल्याने तो कसा करावा हे तुम्ही शोधून काढालच) आम्ही तुम्हाला गांधींचा (महात्मा, सोनिया नाही) आणि संजू बाबाचा प्रत्येकी एक फोटो बक्षीस देणार आहोत. ही फुले तुम्ही ती विकणार्या मुलांकडून योग्य (विकणार्याच्या दृष्टीने, तुमच्या नाही) दराने विकत घेतली असतील अशी आशा आहे. नसल्यास तसं आधी आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला एक गुलाबाचं रोप ही देऊ.
आपल्या फोन/मेल ची वाट पाहत आहे.
तुका लोकी निराळा
8 years ago
No comments:
Post a Comment