कालच्या ई-सकाळ मधील वृत्त्तानुसार "गुड-मॉर्निंग" नावाचं पथक सासवड मधे एक अभियान सुरु करत आहे. कसलं ते सकाळ च्या शब्दातच वाचा.
आपापल्या पोटांची स्वच्छता करणार्यांना जागीच अटक करून थेट पोलीस स्टेशन ला आणलं तर त्यांच्यावर पुढची कारवाई म्हणजे नक्की काय करणार ह्याचा विचार करता करता आमची मती कुंठीत झाली आहे.
बातमीतल्या लाल वर्तुळातील आडनावाचा बातमीशी संबंध असण्याचा योगायोग चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटला नसेलच. वास्तविक आम्ही नावा-आडनावावरून थट्टा करण्याच्या विरुद्ध आहोत मात्र वर्डस्वर्थ१ ने म्हणल्याप्रमाणे नावात काय आहे?
१ खरं तर हे शेक्सपिअर ने म्हणून ठेवलंय, पण नावात काय आहे?
तुका लोकी निराळा
8 years ago
No comments:
Post a Comment