Tuesday, December 23, 2008

खाडिलकरान्चा बंडू

काय बरं त्याचं नाव? हां, त्यागराज, त्यागराज. आम्ही लहानपणापासून त्याला अधून मधून बघत आणि ऐकत आलोय. तो भविष्यात दिवे लावणार हे आमच्या बाल-मनाने त्याच सांगितीक पदार्पण पाहतानाच जोखलं होतं *
तेव्हा आम्ही शाळेत होतो.

स्मरण यात्रा ह्या कार्यक्रमातून बंडू च पहिलं दर्शन झालं. मुकुंद फणसळ्कर, मृदुला दाढे हे गायक पण ह्याच कार्यक्रमात भेटले.** पण बंडू ख़ास लक्षात राहिला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तो फारच चुळ्बूळ करत होता. कानात बोटं घाल, नाकच खाजव, मांडी हलवत बस असं काही ना काहीतरी तो सतत करत होता. थोडक्यातच स्वस्थ रहाणं
हां आपला स्वभाव नाही हे तो दाखवून देत होता. आमच्या कुशाग्र + बुद्धीने तेव्हाच ओळखल की बंडू सतत दिवे लावत राहणार.

त्या नंतर तो कायम ह्या ना त्या कार्यक्रमातून दर्शन द्यायचा. एका मोठ्या पार्श्व-गायकाला मराठी जनता कशी मूकली आहे हे दाखवायाचा तो परोपरीने प्रयत्न करायचा. दुर्दैवाने अस फक्त त्यालाच वाटत होतं. त्याच्यातली कला जोखण्याची ताकद कोणात नाही अशी त्याची एकंदर देहबोली असायची. मग तो संगीत द्यायला लागला. (सांगा पाहू त्यांने संगीत दिलेलं एकतरी गाणं. आहे की नाही अवघड! मग? ते साधं काम नाहीच आहे मुळी) त्याने संगीत दिलेलं गाणं गायल्यामुळे त्याची बहीण अमृता सा-रे-ग-म जिंकता जिंकता राहिली. पण म्हणून बंडू ने काही हार मानली नाही. कलाकाराने स्वत:ला मोठ समजू नये हे त्याने अगदी शब्दश: घेतलं. तो अजूनच लहान लहान असल्यासारखं करायला लागला.

पण परवा झी मराठी ने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात त्याला पाहिलं, आणि त्याच्या प्रयत्नांना यश अल्याचं पाहून बरं वाटलं. त्याला फायनली दिशा सापडली आहे.

आम्ही लहान असताना, ऑर्केस्ट्रा मध्ये एक मिमिक्री आइटम असायचा. गाण्यांच्या मधे प्रेक्षकांची हसवून करमणूक करणारे हे आर्टिस्ट दादा कोंडके, श्रीराम लागू आदींच्या नकला वगैरे करायचे. बंडू ने ह्या कलेला पुनर्जीवन दिल आहे. तूम्ही हा कार्यक्रम पुन:प्रक्षेपित झाला तर चुकवू नका. बन्डूच रूपड, त्याचा वेष, त्याचा नाच, गाण्यात मुळीच अपेक्षित नसलेल्या आलापी सगळच हास्यास्पद! मिमिक्री ची गरजच काय हा प्रश्न कोणी विचारला नव्हता आणि त्याला गाण्याचाच पर्याय देणार्या बन्डूच कौतुक किती करावं?

बंडू, तूला दिशा सापडली आहे. तू असाच आम्हाला हसवत रहा. माकड-चेष्टा कर, उडया मार, नाही त्या ताना घे तूला ते शोभतं लेका. गायला काय खूप जण आहेत.

* आत्म-स्तुति करू नये, पण काय ही दूर-दृष्टी !
** तुम्हाला आठवत असेल तर सुधीर गाडगीळ आणि शैला मुकुंद ह्यांनी निवेदन केल होतं। त्या काळी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमांच निवेदन मराठीत करायची प्रथा होती.
+ कुश - गवत, अग्र - टोक : कुशाग्र बुद्धि - गवताच्या टोकावर मावेल एवढी

4 comments:

  1. त्याच्यातली कला जोखण्याची ताकद कोणात नाही अशी त्याची एकंदर देहबोली असायची.
    The best statement in the post!

    ReplyDelete
  2. आपली लिहीण्याची शैली भन्नट आहे

    ReplyDelete
  3. त्याचा तो हिरवा आणी नंतर घातलेला लाल टि शर्ट पाहून मी गडाबडा लोळलो. त्यात दिसनारे ते छोटे छोटे हात आणि बेढब पोट त्याचा गाण्यापेक्षा जास्त सुख देऊन गेले. मी देखील त्यागराजने त्याग लेल्या ड्रेस वर लिहायचा विचार केला होता.

    ReplyDelete
  4. Tyaagaraj nee "tyaag lelyaa" - Vaah! :-)

    ReplyDelete