टी व्ही वर कुठे तरी दाखवलं असेल. एवढा मोठा राष्ट्रीय अभिरूचीशी संबंध असणारा विषय टाळण्याइतकी आपली प्रसारमाध्यमं नक्कीच नाठाळ नाहीत. पण आम्ही सदानकदा "तोडू बातम्या" दाखविणारी च्यानेल्स बघण्यात मश्गूल असतो. त्यावर अधून-मधून ऊघडाबंब आमीर खान दिसला. पण आम्ही त्याच्या टरारून फुगलेल्या अंगावरचं गोंदवलेलं वाचण्यातच वेळ घालवला. (इतकं करून ते शेवटी वाचता आलं नाहीच) त्यामुळे बातमी आम्ही कधी ऐकलीच नाही.
शेवटी आज विकीपिडीया वरून कळलं की "गजनी" हे ह्या चित्रपटातल्या गुंडाचं नाव आहे. विकीपिडीया जिंदाबाद ! आम्हला एक कोडं सुट्ल्याचं समाधान मिळालं. त्यातल्या आमीर खान च्या बॉडीला, एट पॅक ऍब्स म्हणतात म्हणे. आम्ही परवाच एका साईट वरून "हाऊ टू गेट सिक्स पॅक ऍब्स" असं पुस्त्तक डाऊनलोड केलं. आमचं हे असंच असतं, वरातीमागून घोडं. आता राहणार की नाही आमचे ऍब्स जगाच्या दोन पॅक्स मागे? चालायचंच.
नेहेमी प्रमाणे वेळ हो
ताच, आणि सुदैवाने नेट चालू होतं म्हणून आम्ही आमची जिज्ञासा जागृत केली आणि अजून शोध घेतला. त्यात आमीर खान ला नाभिक-गिरी ची हौस असल्याचं कळलं. वा! आपल्याला हे जाम आवडलं. नेहेमीप्रमाणे त्याला किरण ताईंचा फोन गेला होता की "आमीर, कुठे हजामती करतो आहेस?". But she was literal and not at all metaphorical this time.मंदीत फुकटचे खर्च नको म्हणून आम्ही केस वाढवित आहोत, मात्र आमीर खान च्या हस्ते क्षौर आणि श्मश्रू होणार असेल तर आम्ही गजनी कट करून घ्यायला तयार आहोत.तुमच्या कडे आमीर चा फोन नं आहे का? असल्यास जरूर कळवा. पाणी, वाटी, वस्तरा, साबण हे आम्ही भागीदारी तत्त्वावर पुरवू.
१. ऊच्चारण असा नवीन शब्द सा-रे-ग-म-प आणि पल्लवी जोशी ताई ह्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला कळला. आम्हाला ऊच्चार आणि ऊच्चाटन हे माहिती होतं, पण सांगितलं ना, भाषा विषय कच्चे.

>आता राहणार की नाही आमचे ऍब्स जगाच्या दोन पॅक्स मागे? चालायचंच.
ReplyDelete:D
उच्चारण?? हा असा नवीन शब्द लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! माझाही भाषा विषय कच्चा असं लक्षात आल एकूण! :D :P
वा वा ! असेच लिहा आणि खोचक लिहा !तडकवा एकेकाला !
ReplyDeleteतुमच्या लिहाण्यावर फिदा झालोय
ReplyDeleteहा हा :))
ReplyDelete