इन्डिक-थ्रेड्स ही कॉन्फ़रन्स नुकतीच पुण्यात पार पडली. पुणेटेक ह्या ब्लॉग ने त्याचा एक छान
परामर्श घेतला. अर्थातच पुण्यात घडणारी ही ईव्हेन्ट सकाळ ने कव्हर केली. की-नोट ऍड्रेस मध्ये आनंद ने सांगितलं की मल्टी कोअर चिप्स आणि क्यॅशिंग ह्या कडे प्रोग्रॅमर्स नी लक्ष द्यावं. सकाळ ने हे
"क्यॅचिंग" असं छापलं। ते वाचताना आमची पार च चिडचिड झाली। म्हणजे तो शब्द अगदी डोक्यातच गेला. क्यॅचिंग?? अरे दया करा रे! तुम्हाला ह्याचे दूरगामी परिणाम लक्षात नाही का येत?
- तुम्ही असं काहीतरी लिहीणार.
- माहिती तंत्रज्ञानाने भारावलेल्या ह्या पुण्य-नगरीतले जबाबदार(!) पालक ते वाचणार.
- कुठलीही पोच आणि कशाचही फ़ारसं ज्ञान नसलेले एका चहाच्या बदल्यात ऊगाचच सल्ले देणारे, सल्लापटू ते वाचणार.
- ते ऑपरेटींग सिस्टीम्स, C, C++ वगैरे सगळं जुनं झालं असं ते सांगत फ़िरणार, पुराव्यासाठॊ तुमच्या बातमीचा दाखला देणार.
- पालक ही क्याचिंग, क्याचिंग करत क्लासेस शॊधत फ़िरणार.
आणि मग ह्या नंतर पुन्हा जुन्या फ़ॅड प्रमाणे जर का पालकांनी त्यांच्या मुलांना "नेहरू स्टेडिअम" ला पाठवायला
सुरूवात केली तर त्याला जबाबदार कोण?
No comments:
Post a Comment