आमच्या लहानपणी घरी येणार्या पाहुण्यांना यजमानांच्या मुलांना कोडी घालण्याची सवय (खोड) असायची. कदाचित "लईच कवतिक करतायेत आईबाप पोराच्या हुशारीचं, बघूया तरी" अशी भूमिका त्या मागे असावी. ह्यातलं एक पेटंट कोडं असं होतं की ज्यात निरनिराळे प्रश्न असायचे पण ऊत्तर मात्र सगळ्यांचं एकच असायचं. भाकरी करपली का, घोडी अडली का, पानं कुजली का? ही ती प्रश्नावली. आज आम्ही त्यात एका नवीन प्रश्नाची भर (जी कायमच मौलिक असते ती) टाकत आहोत.
भाकरी करपली का, घोडी अडली का, पानं कुजली का? "गर्लफ्रेन्ड" सोडून गेली, का? फिरवली नाही म्हणून. आमचं असं अवलोकन आहे. हे असे अनुभव कायम दुसर्याला, आमचं बोंबलायला तेवढं फकस्त अवलोकन। चालायचंच. तुम्ही सांगा बरोब्बर की नै ?
ह्या संदर्भात पेट्रोल, डिझेल चे भाव कमी होत आहेत ही "बॉयफ्रेंड" मंडळींसाठी एक विशेष आनंदाची बाब आहे. भागो सिंहगड!
तुका लोकी निराळा
8 years ago
No comments:
Post a Comment