Monday, December 22, 2008

सामंतांची वैशाली

झी मराठी च्या सौजन्याने वैशाली सामंत (लावणी ला आग लावणारी, तीच ती)* हिचं गाणं ऐकण्याचा नुकताच योग आला. अजय-अतुल ह्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात आणि पोलिसान्साठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात ती "कोम्बडी पळाली" गायली**. ते ऐकताना तो योग नसून भोग आहेत हे लक्षात आल.

स्वत: चं लाईव्ह गाणं इतकं वाईट होत असतानाही ज्या अधिकारवाणीने वैशाली सा-रे-ग-म-प च्या स्पर्धकांना सूचना करत असते ते पाहून तीच्या धैर्याचं आम्हाला कौतुक वाटतं. आता खरच सगळे स्वत:हून म्हणायला लागतील की "ऐ वैशाली ताई, आमच्या 10% तरी सूर लावता येतो का तूला? मग का उगाच परीक्षकाच्या खुर्चीत ठेव्हलय म्हणून नाटकं करतेस? दे "नी" नाहीतर तूला गायला लावेन". आणि हे ऐकल्यावर वैशाली काय करेल माहित नाही पण मान्यवर तरी नी देऊन मोकळे होतील, वैशालीचं गाणं कोण ऐकणार?

* लावणी ऑन फायर हा वैशाली चा पहिला अल्बम, ज्यात तिने रेशमांच्या रेघांनी ला धुरी दिली
** वास्तविक गायली असं लिहिताना माझ्या हातांना आणि बुद्धीला खूप त्रास होतो आहे. तसं ही गाणं हे "गायल" जातं, हे सा-रे--- फेम पल्लवी जोशी आणि इतर ह्यांच्या मराठीत बसत नाही. "लास्ट टाइम ला" (हे पल्लवी मराठी आहे.) मी कार्यक्रम पाहत होतो तेव्हा सगळे खूप छान गाणं म्हणत होते.

3 comments:

  1. Mala police ani tyaanche nativaaik yaanchya peksha Asha Bhosalenchi keev vatat hoti.

    Aadhi Tyaagraj (Khadilkarancha!), mag Vaishali Tai..... ani he sagla wah, wah, mhanat aikaaycha!! kiti to manastaap.

    Majhya sarkhyalaa jar Tyaagraaj vaait gatoy he itkyaa sahaj kalat asel tar to kharokharich kiti vaait gaat hota?

    And worse, to swatahalaa tarun pidhicha pratinidhi mhanat hota!! eeeeeks...

    ReplyDelete
  2. मी तुमच्या म्हणण्याशी पूर्णपणे सहमत आहे। वैशाली च अजय-अतुल लाइव मधल "छम छम करता हैं ये नशीला बदन" आणि "कोंबड़ी" ही गाणी अतिशय ख़राब झाली होती। तसेच "सा रे ग म प" चाच एक भाग म्हणुन रविवारी "मस्ती की पाठशाला" दाखवतात। त्यात एक अंधशाळेत तिने "छम छम" परत गायल, परत तसच वाईट होत.
    असे हे परीक्षक। ती छोटी मुले किती तरी छान गातात। खास करून मला प्रथमेश ची सगळी गाणी अतिशय आवडतात। आता बघुया, कोण होत लिटिल चैम्प। की तिथे पण sms चा कही घोळ होतो का ते.

    ReplyDelete
  3. रा. रा. मुकुलजी,
    पागोट्याकडं पाहून धोतर फेडायची नॅक तर तुमच्याकडंही दिसते.
    तुमच्या या ब्लॉगमधले आणखी काय आवडले सांगू?
    तुमच्या प्रोफाईलमधला मजकूर.
    मस्त.
    - ब्लॉगएडिटर, ए-सिडिक कम्युनिकेशन्स, मुंबई

    ReplyDelete